सरत्या वर्षांत श्रमजीवी संघटनेचे पाणी आंदोलन चांगलेच पेटलं होतं

सरत्या वर्षांत श्रमजीवी संघटनेचे पाणी आंदोलन चांगलेच पेटलं होतं

Published on

सरत्या वर्षात भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनांचा एल्गार
टायर कंपन्या आणि आश्रमशाळांची अनागोंदी ठरली चर्चेचा विषय
दिलीप पाटील :सकाळ वृत्तसेवा
वाडा, ता. ३१ : सरते वर्ष वाडा तालुक्यासाठी आंदोलने, प्रशासकीय अनागोंदी आणि प्रदूषणाविरुद्धच्या लढाईने गाजले. जल जीवन मिशनमधील भ्रष्टाचार उघड करणारी श्रमजीवी संघटनेची आंदोलने, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि आरोग्य धोक्यात आणणाऱ्या टायर कंपन्यांचे प्रश्न वर्षभर केंद्रस्थानी राहिले.
पालघर जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने रान उठवले. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी प्रत्यक्ष पाहणी करून निकृष्ट कामांचे पंचनामे केले. मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या योजना अद्यापही ठप्प असून, अनेक ठिकाणी महिलांनी निकृष्ट दर्जाचे पाईप उखडून निषेध नोंदवला. ''प्रत्येक घरात नळ'' या घोषणेचा फोलपणा या आंदोलनामुळे चव्हाट्यावर आला.
शिक्षण क्षेत्रासाठी हे वर्ष अत्यंत क्लेशदायक ठरले. आंबिस्ते आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या आणि आमगाव आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींचा केलेला विनयभंग, या घटनांमुळे आश्रमशाळांमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रकरणांमुळे आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर कडक टीका झाली.
रस्त्यांची दुरवस्था आणि धूळ
भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गाच्या संथ कामामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थ हैराण झाले आहेत. खोदलेले रस्ते आणि धुळीच्या साम्राज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात संताप व्यक्त होत आहे. एकूणच, सरते वर्ष हे वाड्यातील नागरिकांच्या संघर्षाचे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचे दर्शन घडवणारे ठरले आहे
------------------
वाडा तालुक्यातील ७२ टायर कंपन्यांनी प्रदूषणाचा विळखा घातला आहे. यातील ५४ कंपन्या नियम धाब्यावर बसवून काळा धूर ओकत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर काही काळ या कंपन्या बंद होत्या; मात्र आता त्या पुन्हा सुरू होत आहेत. प्रशासन कंपन्यांना पाठीशी घालत असून, आता आम्ही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) धाव घेणार आहोत.
- कल्पेश पाटील, तक्रारदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com