मुंबईतील घरांच्या विक्रीत वाढ
मुंबईतील घरांच्या विक्रीत वाढ
वर्षभरात दीड लाख घरांची विक्री; १३,५०० कोटींचा महसूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाही मुंबईकरांकडून ‘छप्पर फाड के घर खरेदी’ केली जात आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत तब्बल एक लाख ५० हजार २५४ घरांच्या विक्रीची नोंदणी झाली आहे. त्या माध्यमातून राज्य सरकारला १३ हजार ४८७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
मुंबईत घरांच्या नोंदणीचा गेल्या वर्षीच्या तुलनेचा विचार करता सहा टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मागील १४ वर्षांत प्रथमच एवढी मोठी घरांची नोंदणी झाली आहे. मुंबईत घरांच्या किमती जास्त वाढत असून मागणीतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे येथील घरांच्या विक्रीचा आलेख चढता असल्याचे नाइट फ्रँक इंडियाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मुंबई शहराने वर्षभरात नोंदवलेल्या मागणीकडे पाहता बाजारातील तेजी कायम राहिल्याचे अधोरेखित झाले आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये १४ हजार ४४७ मालमत्तांची नोंदणी झाली, त्यामुळे राज्याच्या तिजोरीत १,२६३ कोटी रुपयांची भर पडली आहे.
वर्ष घरांची विक्री महसूल (कोटींमध्ये)
२०२० ६५,६३३ ३,१२२
२०२१ १,११,९१३ ६,१११
२०२२ १,२२,०३५ ८,९०१
२०२३ १,२६,९३७ १०,८७१
२०२४ १,४१,२०२ १२,१४१
२०२५ १,५०,२५४ १३,४८७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

