नवीन वर्षात खारघरवासीयांना बहुप्रतीक्षित विकासकामांची भेट

नवीन वर्षात खारघरवासीयांना बहुप्रतीक्षित विकासकामांची भेट

Published on

नवीन वर्षात खारघरवासीयांना बहुप्रतीक्षित विकासकामांची भेट
ट्राफिक पार्क, सुसज्ज मार्केट आणि समाजमंदिरांचा समावेश
खारघर, ता. १ (बातमीदार) : पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर २०२५ या वर्षात खारघरमधील प्रमुख चौक व सर्कलचे सिमेंट काँक्रीटीकरण, मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, उद्यानांमध्ये मुलांसाठी खेळणी, तरुणांसाठी जिम साहित्य तसेच सुसज्ज प्रभाग कार्यालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता येत्या २०२६ या नवीन वर्षात खारघरवासीयांना ट्राफिक पार्क, भव्य सुसज्ज मार्केट, समाजमंदिरे तसेच पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी तळोजा तलावाच्या पुनरुज्जीवनाची मोठी भेट मिळणार आहे.
पनवेल महापालिकेतील सर्वात मोठा नोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघरमध्ये सिडकोने लंडनच्या धर्तीवर सेंट्रल पार्क उभारले आहे. याच सेंट्रल पार्कजवळ सेक्टर ३५ एफ, प्लॉट क्रमांक ९ ए येथील सुमारे ९ हजार चौरस मीटर जागेत १५ कोटी ८१ लाख २५ हजार रुपये खर्चून भव्य ट्राफिक पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कमध्ये लहान मुलांना वाहतूक नियमांची माहिती देणारी वर्गखोली, रस्ते ओलांडण्याचे प्रात्यक्षिक, बसथांबा, रेल्वे स्थानक, पेट्रोल पंप, रुग्णालय, पोलिस ठाणे, तिकीटघर यांची प्रतिकृती, पोलिस शिल्प, खेळणी, जॉगिंग ट्रॅक, फूड कोर्ट आणि आकर्षक उद्यान असणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईतील हे पहिले ट्राफिक पार्क ठरणार आहे.
याशिवाय सेक्टर १२ मधील सुसज्ज मार्केट नागरिकांसाठी खुले होणार असून, सेक्टर १३ मधील भूखंड क्रमांक १३७ वर समाजमंदिर उभारणीसाठी प्रक्रिया सुरू आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून विविध सेक्टरमध्ये सिडकोकडून भूखंड प्राप्त करून समाजमंदिरे उभारण्याचा संकल्प पालिकेने केला आहे.

चौकट :
ओवे धरणाला मिळणार संजीवनी, पाणीप्रश्नावर तोडगा
पांडवकडा धबधब्याजवळ ओवे डोंगराच्या कुशीत असलेले धरण अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होते. या धरणाच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. धरणातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवण्यात येणार असून, पाण्याची कमतरता भासल्यास येथील पाणी खारघरवासीयांसाठी वापरण्यात येईल. पावसाळ्यात सुमारे पाच एमएलडी तर इतर काळात १.५ ते २ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. पालिका प्रशासनाने मंजूर झालेली सर्व विकासकामे २०२६ मध्ये पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com