सहकर्म फाउंडेशनची रांगोळी स्पर्धा ठरली लक्षवेधी
कलेच्या माध्यमातून संदेश
सहकर्म फाउंडेशनची रांगोळी स्पर्धा ठरली लक्षवेधी
अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) ः सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन यांच्या वतीने रविवारी (ता. ४) अंबरनाथ पूर्वेतील कानसई येथील भाऊसाहेब परांजपे शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर जनजागृती व्हावी, तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती.
तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाचवी ते सातवी गटासाठी निसर्ग व कार्टून, आठवी ते दहावी गटासाठी पर्यावरण वाचवा, आदर्श व्यक्तिमत्त्वे व भारतीय सण-उत्सव, तर खुल्या गटासाठी बेटी बचाओ, ऑपरेशन सिंदूर, महिला व मुलींवरील अत्याचार, महापुरुष अशी विषययोजना करण्यात आली होती.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश दिला. महिला व मुलींवरील अत्याचार, बेटी बचाओ, ऑपरेशन सिंदूर, मदर तेरेसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पाणी वाचवा, प्रदूषण रोखा, पृथ्वी वाचवा, वृक्ष संवर्धन अशा विषयांवर काढलेल्या रांगोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लहान मुलांनी साकारलेली डोरेमोनची रांगोळी विशेष आकर्षण ठरली.
या कार्यक्रमाला रामजीत गुप्ता, तुकाराम पाटील, माणिक पाटील, अशोक शेलार, गोरखनाथ कदम, केतन, महेंद्र गवई, राजकुमारी गुप्ता, शारदा पाटील, रेश्मा कदम, उर्मिला कदम, स्नेहल थोरात, शमिका दरेकर, सुशीला हंडे आदी मान्यवर उपस्थित होते. संजीवनी पाटील व अशोक शेलार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीतल पाटील होत्या. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळाली असून रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक जाणीव आणि जनजागृतीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
विजेत्यांचा गौरव
स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात गट एकमध्ये मनस्वी विजय गायकवाड, किंजल राजकुमार रंगीले व अपूर्व दीपक मंडळ; गट २ मध्ये मिहीर दत्तात्रेय शेलार, एलिना ग्यानी बहादुर व श्रेया सचिन हरिहर; तर खुल्या गटात श्रावणी रवींद्र कुमावत, नम्रता रुपेश जव्हेरी व साक्षी गोकुळ पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

