डिपॉझिटमधून २.६० कोटी जमा
''डिपॉझिट''मधून तिजोरीत २.६० कोटी जमा
ठाणे, ता. ८ (सकाळ वृत्तसेवा) : ठाणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता ६४९ उमेदवार उरले आहेत. या उमेदवारांच्या अनामत रकमेच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत सुमारे २ कोटी ६० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला अर्जासोबत ठराविक अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक असते. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी खुला प्रवर्गासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी (एससी/ एसटी/ओबीसी/महिला) प्रत्येकी २,५०० रुपये जमा करावे लागतात. सुरुवातीला हजारो उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे ही रक्कम मोठी होती. मात्र, छाननीमध्ये अर्ज बाद झालेले आणि अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची अनामत रक्कम परत केली जात असली, तरी सध्या रिंगणात असलेल्या ६४९ उमेदवारांची कोट्यवधींची रक्कम सध्या महापालिका प्रशासनाकडे जमा आहे.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, ज्या उमेदवारांना एकूण वैध मतांपैकी १/६ (साधारण १६.६७ टक्के) मते मिळवता येत नाहीत, त्यांची ही अनामत रक्कम सरकारजमा केली जाते. यालाच राजकीय भाषेत ''डिपॉझिट जप्त होणे'' असे म्हणतात. विजयी उमेदवारांना आणि सन्मानजनक मते मिळवणाऱ्या पराभूत उमेदवारांना ही रक्कम निवडणुकीनंतर परत मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

