

ठाणे, ता. १० : एखादी व्यक्ती बिनविरोध निवडून जात असेल तर तो लोकशाही आणि संविधानासाठी गंभीर इशारा असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले. वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते शनिवारी ठाण्यात आले होते.
ठाण्यात वंचित कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण हे चार प्रमुख मुद्दे घेऊन प्रचार करीत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. एखादी व्यक्ती बिनविरोध निवडून येते तेव्हा तिथे निवडणूकच झालेली नसते. निवडणूक न झाल्याचा अर्थ लोकांनी मतदान केलेले नाही.
म्हणजेच त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जातो. अशावेळी त्यांना लोकप्रतिनिधी म्हणता येईल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या गावगुंडांनी वंचितच्या प्रचार रॅलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.