भाजप-शिवसेना वाद प्रचाराचा केंद्रबिंदू
भाजप-शिवसेना वाद प्रचाराचा केंद्रबिंदू
भाईंदर, ता.१२ (बातमीदार): भाजप, शिवसेनेकडून प्रचारादरम्यान वैयक्तिक चिखलफेक होत आहे. प्रत्येक जाहीर सभा, चौकसभांमधून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता आरोपांची राळ उठवली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील वाद निवडणुकीचे केंद्रस्थानी आहे.
मिरा-भाईंदरमध्ये भाजप व शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच सुरु आहे. भाजपला पुन्हा पालिकेत एकहाती सत्ता स्थापन करायची आहे. मात्र, भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्याचा शिवसेनेकडून निकराचा प्रयत्न केला जात आहे. त्याकरिता वैयक्तिक बदनामी प्रभावी अस्त्रांचा बाजूंकडून मुक्तहस्ताने वापर केला जात आहे. प्रचाराचा प्रकाशझोत मिरा-भाईंदरमधील विकास कामांवर वस्त्रहरण करण्यावरच केंद्रित झाला आहे. शिवसेनेकडून नरेंद्र मेहतांना वैयक्तिक लक्ष्य केले जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पद्धतीने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ‘भ्रष्टाचाराचा रावण’ अशी मेहतांची प्रतिमा मतदारांवर ठसवण्यात आली होते. त्याचा परिणाम म्हणून मेहता पराभूत झाले होते. आता महापालिका निवडणुकीसाठी हीच पद्धत अवलंबण्यात येत आहे. तर रविवारी झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या सभेतही एकनाथ शिंदे यांनी मेहता नामोल्लेख टाळत टीका केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

