मालमत्ता कराचा मुद्दा ऐरणीवर

मालमत्ता कराचा मुद्दा ऐरणीवर
Published on

खारघर, ता. १२ (बातमीदार) : मालमत्ताधारकांसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार लीना गरड यांनी दिलेला शब्द महत्त्वाचा ठरत आहे. गरड यांनी मुद्रांक शुल्क पेपरवर लेखी स्वरूपात ६५ टक्के मालमत्ता कर सवलत देण्याची हमी दिली आहे. ही हमी जाहीर झाल्यानंतर सिडको वसाहतींमधील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

खारघर, तळोजा, कळंबोलीसह इतर सिडको वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय व नोकरदार नागरिक वास्तव्यास आहेत. मागील काही वर्षांत मालमत्ता करात झालेली वाढ, थकबाकीवरील दंड आणि नोटिसांमुळे नागरिकांमध्ये असंतोष होता. अनेकांनी कर भरणे टाळले असून, महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. लीना गरड यांनी नागरिकांशी संवाद साधताना, मालमत्ता कराचा बोजा कमी करणे ही काळाची गरज आहे. कलम १२९ अ चा योग्य वापर करून ६५ टक्के सवलत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी भूमिका मांडली आहे.

लेखी हमीमुळे ही भूमिका केवळ आश्वासन न राहता विश्वासार्ह ठरल्याचे नागरिक सांगत आहेत. गरड म्हणाल्या, की खारघरसह सिडको वसाहतींमधून अद्यापही दोन लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी कर भरलेला नाही. वाढीव कर आकारणी, दंड व व्याज यामुळे अनेक सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुहेरी मालमत्ताच्या विरोधात गरड यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मविआचे उमेदवार लीना गरड, अनिता भोसले, उत्तम मोरबेकर, सोमनाथ म्हात्रे यांना सिडको वसाहतींमधून पाठिंबा मिळत असून, मालमत्ताधारकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात हा मुद्दा महापालिका राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com