अतिउत्साह पर्यटकांच्या अंगलट
अतिउत्साह पर्यटकांच्या अंगलट
चिंचणी समुद्रात भरतीची वेळी कार अडकली
बोईसर, ता.१२(वार्ताहर)ः नवी मुंबईतून चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा उत्साह अंगलट आला. समुद्राला अचानक भरती आल्याने पर्यटकांची कार थेट समुद्राच्या पाण्यात अडकली. चिंचणी किनाऱ्यावर रविवारी (ता.११) ही घटना घडली.
नवी मुंबईहून आलेले पर्यटक रविवारी चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर गाडी घेऊन गेले होते. मात्र, भरतीची वेळी समुद्राचे पाणी झपाट्याने वाढल्याने कार पाण्यात अडकली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने प्रयत्न कार सुरक्षितपणे समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेणे धोकादायक असून पर्यटकांनी भरती-ओहोटीच्या वेळा लक्षात घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

