बदलापूर पूर्व एमआयडीसीत आगींची मालिका
बदलापुरात आगीची मालिका
रासायनिक कंपन्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह!
बदलापूर, ता. १२ (बातमीदार) ः बदलापूर पूर्व एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये आग लागण्याचे प्रकार चालूच आहेत. अवघ्या तीन-चार दिवसांपूर्वी पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीला भीषण आग लागून संपूर्ण कंपनी खाक झाली. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा एमआयडीसी परिसरातील आगीने नागरिकांची चिंता वाढवली आहे. काजय रेमिडीज या कंपनीमध्ये सोमवारी (ता. १२) दुपारच्या वेळेत आग लागली. आगीत जीवितहानी अथवा कोणाला दुखापत झाली नसली तरी, दिवसाढवळ्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीमुळे सतत एमआयडीसी कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या आगीच्या सत्रांमुळे, कंपनीच्या व एमआयडीसी प्रशासनाच्या कामकाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बदलापूर एमआयडीसी परिसरातील पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीला आग लागण्याची घटना नुकतीच घडली. ही आग इतकी भीषण होती, की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बदलापूर, अंबरनाथ व उल्हासनगर या तिन्ही शहरांतील अग्निशमन दलाला नऊ तास लागले. असे असताना सोमवारी प्लॉट क्रमांक २७/५३ येथील काजय रेमेडिस या पावडरयुक्त रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत आग लागली. आग लागताच अग्निशमन दलाला कळवण्यात आले. त्यानंतर काही मिनिटांतच दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे अधिकारी दामोदर वांगड, शैलेश जगताप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. दरम्यान, आगीच्या धुरामुळे कंपनीतील कर्मचारी घाबरून बाहेर पळाले; मात्र कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.
...................
औषधांसाठी लागणाऱ्या रासायनिक पावडरची निर्मिती ही कंपनी करत असल्याने, लागलेल्या आगीचे प्रमाण जरी कमी असले तरी त्याचे परिणाम घातक होते. दूरवर राहूनदेखील रासायनिक पावडरच्या आगीतून निघालेल्या धुराचा त्रास हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला. वेळेत जर ही आग विझवली गेली नसती तर या रासायनिक धुराचा परिणाम आजूबाजूच्या कित्येक किलोमीटरच्या परिसरात पसरून, मोठ्या प्रमाणात शारीरिक हानीची शक्यता वर्तवण्यात आली. पॅसिफिक ऑरगॅनिक आणि त्यानंतर काजय रेमेडिस या कंपन्यांमध्ये लागलेल्या आगीमुळे एमआयडीसीतील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

