बदलापुरात उभारणार ‘बीकेसी’

बदलापुरात उभारणार ‘बीकेसी’

Published on

बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : बदलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर ‘बीकेसी’ उभारण्याची महत्त्वाकांक्षी संकल्पना शहरातील बांधकाम व्यावसायिक अजय ठाणेकर यांनी मांडली आहे. मुंबई उपनगरातून बदलापूरसारख्या शहरात वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत असून, या नागरिकांना मुंबईतील अत्याधुनिक सुविधा परवडणाऱ्या दरात मिळाव्यात, या हेतूने ‘बीकेसी’ अर्थात बदलापूर कात्रप सिटी हा उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
या संकल्पनेअंतर्गत मोठी गृहसंकुले उभारण्यात येणार आहेत. त्यासोबतच सुसज्ज व माफक दरात आरोग्यसेवा देणारी रुग्णालये, परवडणाऱ्या शुल्कातील दर्जेदार शाळा, मार्केट आणि दैनंदिन गरजांसाठी आवश्यक सर्व सुविधा एकाच परिसरात उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अजय ठाणेकर यांनी संकल्पनेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बदलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेतला, तर शहराचा चेहरा-मोहरा बदलू शकतो. प्रत्येकाने विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम केले, तर बदलापूरचा विकास मुंबईच्या धर्तीवर होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बदलापूरचा अभिमान
पुढील पाच वर्षांत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी स्थानिक प्रशासन तसेच स्थापत्यकलेतील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई उपनगरातून बदलापूरमध्ये येणाऱ्या नागरिकांना जसे मुंबईचा अभिमान वाटतो, तसाच अभिमान बदलापूर शहराबाबतही वाटावा, हा या उपक्रमामागचा प्रामाणिक हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभिनव संकल्पनेमुळे शहरात ठाणेकर यांचे कौतुक होत असून, बदलापूरच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com