२० हजार वीज ग्राहकांसाठी १३ कर्मचारी : विक्रमगड तालुक्यात विज समस्या गंभीर
लीडसाठी
२० हजार वीजग्राहकांसाठी अवघे १३ कर्मचारी
विक्रमगड तालुक्यात वीज समस्या गंभीर
विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात निर्माण होणारी विजेची समस्या सोडवण्यासाठी तालुक्याच्या निर्मितीनंतर, म्हणजेच २६ जानेवारी २००९ रोजी येथे महावितरण उपविभागीय कार्यालय सुरू करण्यात आले. मात्र, तेव्हापासून आजतागायत आवश्यक असलेल्या कर्मचारीवर्गाची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील वीजग्राहकांना सुविधा पुरवताना तुटपुंज्या कर्मचारीवर्गावर एकप्रकारे ताण येत आहे. मागील १५ वर्षे हीच परिस्थिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, शहरातील २० हजार नागरिकांप्रमाणेच तालुक्यातील इतर भागांतील वीजग्राहकांसाठी येथे अवघे १३ कर्मचारी असल्याने वीज समस्येला सामोर जावे लागत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. तसेच विक्रमगड तालुक्यात उभारण्यात आलेले महावितरणचे उपविभागीय कार्यालय नावापुरतेच असल्याची प्रतिक्रियादेखील नागरिकांनी दिली.
विक्रमगड तालुक्यातील ओंदे वीज केंद्रा अंतर्गत साखरा, विक्रमगड व आलोंडा असे तीन ट्रान्स्फॉर्मर उभारण्यात आले आहे. या ट्रान्सफॉर्मर अंतर्गत शहरासह ग्रामिण भागातही वीजपुरवठा केला जातो. यात एक हजार ३०० किमीची एटी वाहिनी, ३८० किमीची एलटी वाहिनी व ४०० किमीची केव्ही वाहिनीचा समावेश आहे. विक्रमगड हा दुर्गम व जंगलपट्ट्याचा भाग असल्याने पावसाळ्यात या सर्व वाहिन्यांमध्ये किंवा ट्रान्स्फॉर्ममध्ये बिघाड होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात येथे अनेक ठिकाणी वीज खंडित होण्याचे प्रकारदेखील घडतात. मात्र, विक्रमगड तालुक्यात असलेल्या महावितरणच्या हजारो वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी फक्त १३ कर्मचारी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येतो व ते वीजग्राहकांच्या अपेक्षेनुसार सेवा देऊ शकत नाहीत.
वाढती लोकसंख्या व दिवसेंदिवस उभ्या राहणाऱ्या वसाहतींमुळे महावितरण कार्यालयात येणाऱ्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देणे आवश्यक आहे, पण अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे या तक्रारी निवारण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे सुशासन कार्यप्रणाली व कर्मचाऱ्यांची संख्या वाढावी, अशी मागणी होत आहे. तालुक्याचा विस्तार पाहता विक्रमगड येथे तीन सेक्शन सहाय्यक अभियंता कार्यालय कार्यान्वित होण्याची आवश्यकता आहे. सध्या येथे एकच शाखा असल्याने वीजपुरवठा खंडित होणे, नवीन वीज जोडणी, मीटर बदलणे, डागडुजी व वीज चोरीवर आळा बसवण्यासाठी येथे कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने गरज असल्याचेही सांगण्यात येत आहे. महावितरणने वीजग्राहकांच्या या मागणीकडे लक्ष द्यावे, असेही नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
प्रतिक्रिया :
विक्रमगड तालुका झाल्यानंतर येथे उपसहाय्यक अभियंताचे कार्यालय उभारण्यात आले, पण आता येथे वीजग्राहकांची वाढती संख्या व त्यांना चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने तीन नवे सेक्शन सहाय्यक अभियंता कार्यालय व्हावे, अशी आमची मागणी आहे.
- नितीन वाडेकर
(जिल्हाप्रमुख आध्यात्मिक सेना)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

