१६ किलोमीटर समुद्री सैर

१६ किलोमीटर समुद्री सैर

Published on

१६ किलोमीटर समुद्री सैर
वेव्ह रायडर्सतर्फे खुली सागरी जलतरण मोहीम

मुंबई, ता. १३ : खुल्या सागरी जलतरणातील आघाडीची संस्था असलेल्या वेव्ह रायडर्सतर्फे रविवारी (ता. ११) कासा रॉक ते एलिफंटा लेणींदरम्यान १६ किलोमीटर खुली सागरी जलतरण मोहीम यशस्वी पार पडली.
अ‍ॅक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगडच्या देखरेखीखाली झालेल्या जलतरण मोहिमेमध्ये अधिराज सिंग, नैकज कोथळकर, श्लोक फुलारे, अयांश म्हात्रे, सार्थक रेणकवार, राजेश देहुरी, शंकर बेहरा, सॅम हेम्ब्रेम, दिव्येश कोळी आणि संग्राम जाधव या दोन रिले संघांचा सहभाग होता. याव्यतिरिक्त निहार पाटील आणि निहाल कोळी यांनी वैयक्तिक श्रेणीत जलतरणचे कौशल्य दाखवले. सहभागी जलतरणपटूंना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ओपन वॉटर जलतरणपटू आणि प्रशिक्षक प्रभात कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. महासागरांना प्रदूषणमुक्त ठेवण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या मोहीमेचा उद्देश आहे. उपक्रमाला अनुशक्ती नगर क्रीडा व्यवस्थापन समितीकडून प्रोत्साहन मिळाले आहे.

फोटो - 489

Marathi News Esakal
www.esakal.com