ग्लेनईगल्स रुग्णालयाला एनएबीएच मानांकन
ग्लेनईगल्स रुग्णालयाला एनएबीएच मानांकन
मुंबईतील एकमेव अत्याधुनिक स्ट्रोक उपचार केंद्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : स्ट्रोक उपचारांच्या क्षेत्रात परळच्या ग्लेनईगल्स रुग्णालयाने महत्त्वाची कामगिरी करीत वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएसओ) - एनएबीएच अॅडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटरचे मानांकन मिळवले आहे. शहरातील स्ट्रोक उपचार व्यवस्थेत मोठा टप्पा गाठत हे मानांकन मिळवणारे ग्लेनईगल्स रुग्णालय मुंबईतील एकमेव खासगी रुग्णालय ठरले आहे.
रुग्णालयाच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा, काटेकोर रुग्ण उपचार मार्गदर्शक तत्त्वे, सक्षम आपत्कालीन प्रणाली तसेच स्ट्रोक रुग्णांसाठी उपलब्ध प्रगत निदान व उपचार सेवांच्या सखोल मूल्यमापनानंतर हे मानांकन देण्यात आले आहे. स्ट्रोक उपचार कार्यक्रमाचे नेतृत्व वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. शिरीष हस्तक आणि डॉ. पंकज अग्रवाल करत असून, इंटरव्हेन्शनल तज्ज्ञ व अतिदक्षता उपचार तज्ज्ञांचे अनुभवी पथक निदानापासून ते पुनर्वसनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाची भूमिका बजावतो.
‘डोअर-टू-नीडल टाइम’ आणि ‘डोअर-टू-ग्रोइन टाइम’ यांसारख्या वेळेशी संबंधित आंतरराष्ट्रीय मानकांचे येथे काटेकोर पालन केले जाते. येथील प्रगत न्यूरो क्रिटिकल केअर युनिट, २४x७ स्ट्रोक टीम, अत्याधुनिक न्यूरो-इमेजिंग, थ्रोम्बोलायसिस व थ्रोम्बेक्टॉमीसारखे उपचार आणि ४.५ तासांच्या उपचारासाठीच्या सुवर्णकालावधीमध्ये जलद उपचार देण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. यासोबतच रुग्णालयाला डब्ल्यूएसओ एंजल्स अवॉर्ड्स समितीकडूनही विशेष मान्यता मिळाली आहे.
याबाबत ग्लेनईगल्स रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन चेवले म्हणाले, एनएबीएच आणि डब्ल्यूएसओ या दोन्ही मानांकनांमुळे रुग्णसेवा अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह झाली आहे. स्ट्रोक रुग्णांची संख्या वाढत असताना, आम्ही आपत्कालीन प्रतिसाद अधिक मजबूत करून वेळीच निदान व अचूक उपचार देण्यावर भर देत आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

