विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणाचा आदर्श...
विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणाचा आदर्श
रस्त्यावर सापडलेली एक लाखांची बॅग मूळ मालकाला परत
विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) ः यशवंत नगर परिसरात विक्रमगड महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. एक लाख रूपये आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग विद्यार्थ्यांनी मूळ मालकाला परत केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सेवानिवृत्त वनसंरक्षक मनोहर चौधरी हे बँकेत पैसे भरण्यासाठी जात होते. त्याच दरम्यान त्यांच्या हातातील एक लाख रुपये व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग रस्त्यावर पडली. काही वेळानंतर याच मार्गावरून जाणाऱ्या विक्रमगड महाविद्यालयाच्या अमित महाले, जयेश म्हस्के, अनिकेत डांगटे, आदेश मोरघा, रितेश भेलका, विघ्नेश मोरघा, साहिल मोरघा आणि एकनाथ मोरघा या विद्यार्थ्यांना मिळाली. ही बॅग विद्यार्थ्यांनी उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये मोठी रोख व महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया वागळे यांना माहिती दिली. सुप्रिया वागळे यांनी बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे मनोहर चौधरी यांच्याशी संपर्क साधला. व त्यांना शाळेत बोलावून सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत ती बॅग सुरक्षितपणे त्यांच्या स्वाधीन केली.
बॅग परत मिळाल्याने चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग व शाळा व्यवस्थापनाचे आभार मानले. आजच्या काळात अशी प्रामाणिक आणि संस्कारक्षम पिढी पाहून समाधान वाटते, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांनी दाखवलेला आदर्श इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

