आज ''लोकशाहीचा उत्सव''

आज ''लोकशाहीचा उत्सव''

Published on

आज ''लोकशाहीचा उत्सव''
४.३९ लाख मतदार ठरवणार ४३२ उमेदवारांचे भवितव्य; कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात
उल्हासनगर, ता. (वार्ताहर): शहराच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणारा क्षण अखेर जवळ आला आहे. आज सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत उल्हासनगर महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ७८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत प्रशासनाने पारदर्शक आणि निर्भय वातावरणात मतदान घडवून आणण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रत्येक पातळीवर काटेकोर तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रांची आखणी असो, कर्मचारी नियोजन असो, ईव्हीएमची सुरक्षितता असो वा कडेकोट पोलिस बंदोबस्त निवडणूक शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

प्रशासनाने ईव्हीएम यंत्रणा सुसज्ज ठेवली असून त्यासाठी ९३५ सी.यू. (नियंत्रण कक्ष) आणि १,९२३ बी.यू. (मतनोंदणी यंत्र) उपलब्ध आहेत. ६ जानेवारीलाच यंत्रांचे सीलिंग पूर्ण करून ती ''स्ट्रॉंग रूम''मध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. दुबार मतदानावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने विशेष तपासणी पूर्ण केली असून दोषींवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

तक्रार निवारण आणि संपर्क
आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. टोल फ्री नंबर १८००२३३११०१ / १८००२३३११०३, थेट संपर्क (०२५१) २७२०१४९ / २७२०१४३ यावर नागरिक संपर्क साधू शकतात.

संवेदनशील क्षेत्र: अतिसंवेदनशील प्रभागांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी २५ पोलिस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी कार्यरत आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी शहरात छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


निवडणुकीचा लेखाजोखा
तपशील आकडेवारी
एकूण जागा ७८ (२० प्रभाग)
अंतिम रिंगणातील उमेदवार ४३२
एकूण मतदार ४,३९,९१२
पुरुष मतदार २,३२,७३६
महिला मतदार २,०७,०२२
मतदान केंद्रे ५९६ (१२४ इमारतींत)

सुरक्षा आणि कर्मचारी व्यवस्था
पोलिस अधिकारी व कर्मचारी : १,२४५
होमगार्ड: १,०५०
विशेष तुकड्या: एसआरपीएफच्या २ प्लॅटून तैनात.
निवडणूक कर्मचारी: ३,२७८ कर्मचाऱ्यांची फौज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com