मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल
निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवला
अंबरनाथमधील मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल
अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर): निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे आदेश न बजावणे एका मुख्याध्यापिकेला महागात पडले आहे. उल्हासनगर महापालिका निवडणूक कामात कसूर केल्याप्रकरणी अंबरनाथ येथील इन्फंट जीसस स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिपा एडविन यांच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत १३ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्तांच्या आदेशानुसार, अंबरनाथच्या इन्फंट जीसस स्कूलमधील २३ कर्मचाऱ्यांना २८ डिसेंबर रोजी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मुख्याध्यापिकांनी शाळेतील २३ कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणाचे अधिकृत आदेश बजावले नाहीत. तसेच प्रशासनाने यापूर्वी विचारलेल्या ''कारणे दाखवा'' नोटीसलाही मुख्याध्यापिकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे निवडणूक प्रशिक्षणात आणि नियोजित कामकाजात मोठा व्यत्यय निर्माण झाला. याबाबत उल्हासनगर पालिकेचे सामान्य प्रशासन विभाग प्रमुख अजित रत्ना गोवारी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत मंगळवारी (ता.१३) सायंकाळी गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी वरिष्ठ पोलस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

