भिवंडीत मोठा पोलिस फौजफाटा

भिवंडीत मोठा पोलिस फौजफाटा

Published on

भिवंडीत पोलिसांचा कडा पहारा
तीन हजार पोलीस तैनात; ड्रोनसह १७०० सीसीटीव्हींची नजर
भिवंडी, ता. १३ जानेवारी (वार्ताहर): कल्याण-डोंबिवली पाठोपाठ संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीतही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांतता आणि सुव्यवस्थेसाठी शहरात तब्बल २,९९६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज उतरवण्यात आली असून, आज शहरातील मुख्य रस्त्यांवरून पोलिसांनी जोरदार पथसंचलन (रूट मार्च) केले.

निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. उच्चपदस्थ अधिकारी, १ अतिरिक्त पोलिस आयुक्त, २ पोलिस उपायुक्त, ८ सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्यासह २५ पोलिस निरीक्षक, ६० पोलिस उपनिरीक्षक अशा एकूण ९६ अधिकाऱ्यांसह १५५० पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. त्याचबरोबर १०५० होमगार्ड आणि राज्य राखीव पोलिस बलाच्या ३ कंपन्यांमधील ३०० जवान सुरक्षेची धुरा सांभाळतील. शहराच्या कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी हायटेक यंत्रणेचा वापर केला आहे. १७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे शहरात सक्रिय आहे. २५ ड्रोन द्वारे हवेतून देखरेख केली जाणार आहे. संवेदनशील ठिकाणी ५० विशेष कॅमेरे स्वतंत्रपणे बसवण्यात आले आहेत.

निर्भीड मतदानाचे आवाहन
नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल," असा इशारा भिवंडीचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिला आहे.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी शहरातील संवेदनशील परिसरात पोलिसांकडून पथसंचलन करण्यात येत असून, मतमोजणीच्या दिवसापर्यंत हा कडेकोट बंदोबस्त कायम राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com