देशांतर्गत मागणी यंदा वाढण्याचा अंदाज

देशांतर्गत मागणी यंदा वाढण्याचा अंदाज

Published on

देशांतर्गत मागणी यंदा वाढण्याचा अंदाज
आदित्य बिर्ला कॅपिटल एएमसीचा वार्षिक आढावा

मुंबई, ता. १४ : सरकारने दिलेल्या करसवलती, व्याजदर कपात यामुळे सर्वच क्षेत्रांतील देशांतर्गत मागणी चांगल्या प्रमाणावर वाढेल. खासगी कंपन्या भांडवली गुंतवणुकीला सज्ज आहेत. मात्र, अमेरिकी व्यापार कराराची परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच याला वेग येईल, असा अंदाज आदित्य बिर्ला कॅपिटल एएमसीतर्फे त्यांच्या वार्षिक आढाव्यात व्यक्त करण्यात आला.
कंपनीचे सीईओ ए. बालसुब्रमण्यन, हरीश कृष्णन, कौस्तुभ गुप्ता आदींनी पत्रकारांना ही माहिती दिली. या वर्षात सरकारचा भांडवली खर्च घटू शकतो. या वर्षातील पर्जन्यमानदेखील गेल्या दोन वर्षांएवढे चांगले नसेल असा अंदाज आहे. तरी अन्नधान्य चलनवाढ साडेचार टक्क्यांच्या आसपासच राहील. एकंदर चलनवाढही स्थिर राहील. एकंदर जागतिक वाढ संथ राहिली तरी ती घसरणार नाही, फारतर थोडे चढ-उतार होतील, असा अंदाजही या वेळी व्यक्त करण्यात आला.
हे वर्ष एकसुरी, एकसंथ नसेल. या वर्षात भूराजकीय तणाव तसेच अमेरिका-भारत व्यापार करार आणि रुपयाच्या भावातील उतार-चढाव हे मोठे धोके आहेत. मात्र, या वर्षात कंपन्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर वाटेल तसे वाढण्याचे दिवस आता संपले आहेत. सध्याच्या स्थितीत मोठे शेअरच चांगल्या अवस्थेत असल्याचे दिसते, असेदेखील हे अधिकारी म्हणाले.
रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात आणि बाजारात रोकड आणण्याचे उपाय, आयकर आणि जीएसटी दरात केलेली कपात, यामुळे लोकांच्या हातात पैसा खेळणार आहे. त्यामुळे मागणी वाढेल तसेच कंपन्यांचे उत्पन्नही वाढेल, असेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com