समुपदेशनाच्या स्पर्धेत जयवंत कुलकर्णी यांचा टॉप टेनमध्ये समावेश
समुपदेशनाच्या स्पर्धेत जयवंत कुलकर्णी यांचा टॉप टेनमध्ये समावेश
मुंबई, ता. १४ : प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाच्या स्पर्धेत पुण्या-मुंबईतील शिक्षकांनी बाजी मारली आहे. यात मुंबईतील ज्येष्ठ शिक्षक व समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांचा राज्यातील टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे.
‘एससीईआरटी’ने राज्यभरातील आठ विभागांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली हेाती. यामध्ये मुंबईतील गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला येथील येथील शिक्षक समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांची व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन राज्यस्तरीय स्पर्धेतून टॉप टेनमध्ये निवड झाली आहे. या स्पर्धेअंतर्गत ‘करिअर समुपदेशनातील मानसशास्त्रीय चाचण्यांची उपयुक्तता’ या विषयावरील प्रभावी व नावीन्यपूर्ण सादरीकरणामुळे टॉप टेन विजेत्यांमध्ये स्थान मिळविले आहे. या वेळी चाळीस स्पर्धकांनी राज्यातून ऑनलाइन पद्धतीने विविध विषयांवरील सादरीकरणे केली, तर इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करताना वापरल्या जाणाऱ्या मानसशास्त्रीय चाचण्यांचे दिवसेंदिवस वाढत चाललेले महत्त्व अधोरेखित करत जयवंत कुलकर्णी यांनी राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये जीएटीबी, डॅट बी, तमन्ना, सीआयएस, फाईव फील्ड व ट्वेल फील्ड इंटरेस्ट इन्व्हेंटरी, ऍडजस्टमेंट इन्व्हेंटरी, एमएमपीआय, सिक्स्टिन पीएफ, एनव्हीटीआय, अशा विविध मानसशास्त्रीय चाचण्यांची शालेय स्तरावर दहावी आणि बारावीसाठी असलेली उपयुक्तता विशद केली. आपल्या सादरीकरणात कुलकर्णी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था दिल्ली तसेच वाधवानी फाउंडेशन यांनी विकसित केलेल्या ‘माय करिअर ॲडव्हाईझर’ या ॲपद्वारे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अभियोग्यता, अभिरुची आणि व्यावसायिक मूल्यांचे कशा प्रकारे मार्गदर्शन घेता येईल याबाबत माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

