मतदान केंद्रांवर गोंधळ

मतदान केंद्रांवर गोंधळ

Published on

मतदान केंद्रांवर गोंधळ
याद्यांमधील चुकांमुळे मतदारांना मनस्ताप
भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांमधील गोंधळाचा परिणाम मतदानाच्या दिवशी दिसून आला. यादीत नावे सापडत नसल्याने तसेच एका प्रभागातील मतदाराचे नाव दुसऱ्या प्रभागात असल्याने मतदारांना मनस्ताप झाला.
मिरा-भाईंदरमध्ये सकाळच्या पहिल्या दोन तासांत मतदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कामावर जण्याची घाई असलेले मतदार सकाळी साडेसातला केंद्रावर पोहोचले होते. मात्र, कोणत्याही केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र दिसून आले नाही. काही ठिकाणची केंद्र ओस पडली होती. त्यामुळे सकाळी ९.३० पर्यंत अवघे ६.७२ टक्के मतदान झाले. सकाळी १०च्या सुमारास लोक मतदानासाठी बाहेर पडले. वरिष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. काही वरिष्ठ नागरिक व्हीलचेअरवर बसून, तर काही मतदान सहाय्यकांच्या मदतीने मतदान केंद्रात जात होते.
-----------------------------
मतदान यंत्राबद्दल तक्रारी
- मतदान केंद्रात सकाळच्या वेळी मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोगाचे कर्मचारी नसल्याचे दिसून आले. अनेक मतदान केंद्रांवर मतदार यादीचा भाग क्रमांक अथवा खोली क्रमांक ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने दिसत नव्हता. मतदान नेमके कुठे करायचे याबाबत गोंधळ उडत होता.
- काही मतदार त्यांना मिळालेल्या मतदान चिठ्ठ्या घेऊन केंद्रावर गेले. मात्र, त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याचे सांगण्यात आले. मतदान यंत्राबद्दलही काही ठिकाणी तक्रारी केल्या जात होत्या. मात्र, नेहमीच्या मतदान केंद्रात गेल्यावर त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रात असल्याचे दिसून आले.
----------------------------
तणावाचे वातावरण
भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक परिसरात असलेल्या मतदान केंद्रातील यंत्र सुमारे एक तास बंद पडले होते. यंत्र दुरुस्त झाल्यानंतर मतदान पुन्हा सुरू झाले. काही केंद्रांवर यंत्र बंद पडत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या, तर भाईंदर पश्चिम प्रभाग ८ मधील एका केंद्रावर ठाकरे गटाच्या निशाणीसमोरील बटण दाबलेच जात नव्हते. मिरा-रोडच्या शांतीनगर येथील केंद्रात भाजप उमेदवारांची नावे असलेले बॅच लावून पोलिंग एजंट मतदान केंद्राच्या आत बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या वेळी विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com