

संक्रांतीनंतर वातावरण बदलून उष्णता वाढणार
आरोग्याची काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
जव्हार, ता. १५ (बातमीदार) : खगोलशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर वातावरणात हळूहळू बदल जाणवतो व उष्णतेत वाढ होते. याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होतो, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
मकर संक्रांत हा केवळ धार्मिक सण नसून तो खगोलशास्त्रीय आणि भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजेच सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे आपला प्रवास सुरू करतो. या अवकाशातील बदलाचा थेट परिणाम पृथ्वीवरील ऋतू, तापमान, दिवस-रात्र कालावधी आणि वातावरणावर जसा होतो, तसा त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही जाणवतो. त्यादृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे २३. ५ अंश कललेली असल्यामुळे वर्षभर सूर्यकिरणांची दिशा बदलत राहते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकरवृत्तावर येतो. त्यानंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो. यामुळे उत्तर गोलार्धात विशेषतः भारतात, सूर्यकिरण अधिक थेट पडू लागतात आणि तापमान हळूहळू वाढण्यास सुरुवात होते. उत्तरायण सुरू झाल्यानंतर दिवसाचा कालावधी वाढतो, तर रात्र लहान होत जाते. थंडीची तीव्रता कमी होऊ लागते. पहाटेचे धुके, गार वारे आणि दवाचे प्रमाण हळूहळू घटते. वातावरण अधिक स्थिर होऊ लागल्याने हवामानात बदल जाणवू लागतात.
चौकट
सध्याच्या काळात जागतिक तापमानवाढीमुळे ऋतुचक्रात काही प्रमाणात बदल होत असले तरी सूर्याचे उत्तरायण हा निसर्गचक्राचा मूलभूत आधार आहे. हिवाळा कमी कालावधीचा होणे, उन्हाळ्याची तीव्रता वाढणे आणि पावसाचे स्वरूप बदलणे, असे परिणाम दिसून येत आहेत. निसर्गातील या बदलांमुळे मानव, शेती आणि पर्यावरणाच्या जीवनक्रमावर दूरगामी परिणाम होत आहेत.
-------------------
मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होत असली तरी सकाळ, संध्याकाळ गारवा टिकून राहतो. या काळात सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप यासारखे आजार बळावतात. त्यामुळे सकाळी कोमट पाणी पिणे, वाफ घेणे आणि थंड पदार्थ टाळणे उपयुक्त ठरते. अचानक उष्णता वाढत असल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. म्हणून दिवसातून पुरेसे पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
डॉ. संजय कावळे,
वैद्यकीय अधीक्षक, जव्हार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.