आता जनमताची उत्सुकता
आता उत्सुकता जनमताची
वसई-विरारच्या भवितव्याचा आज निर्णय
वसई, ता. १५ (बातमीदार)ः वसई-विरार शहर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान पार पडले. या वेळी काही केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाला, तर कुठे केंद्रच दुसरीकडे आल्याने गोंधळाचे वातावरण झाले होते, पण मतदानाचा हक्क बजावत मतदारांनी वसई-विरारचे भवितव्य मतपेटीत बंद केले.
महापालिकेच्या निवडणुकीत ५४७ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांसाठी गुरुवारी (ता.१५) मतदान झाले. शहरातील एक हजार ३३५ मतदान केंद्रांवर आठ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. गावात, शहरातील मतदान केंद्रांवर सकाळी मतदारांमध्ये वातावरण दिसले नाही. तुरळक प्रमाणात मतदान झाले. त्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक होती. मात्र, दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. नवमतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिलांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतला. त्यामुळे शुक्रवारी पालिकेवर कोणाचे राज्य येणार, याची उत्सुकता लागली आहे.
------------
ईव्हीएममध्ये बिघाडाच्या घटना
- वसई-विरार शहर पालिका क्षेत्रात मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद, तर कुठे संथ गतीने सुरू होत्या. त्यामुळे मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे निवडणूक विभागाची धावपळ झाल्याचे चित्र होते.
- उमेळमान, वाघोली, उमराळेसह काही भागात मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या, परंतु प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण होते, तर मतदान केंद्र लांब असल्याने अडचणी निर्माण झाल्याने अनेकांना पायपीट करावी लागली.
-------------
वादावादीचे प्रकार
विरार महापालिका निवडणुकीत काही मतदार केंद्रांवर शाब्दिक बाचाबाचीचे प्रकार झाले, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.
नवमतदारांसह, तरुणाई, ज्येष्ठांनी मतदान करण्याचे आवाहन केले. समाजमाध्यमांवरही मतदान केल्याच्या छायाचित्रांचा पाऊस पडला होता.
-------------------------------
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील काही मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी होत्या. त्या त्वरित दूर केल्या आहेत. तसेच दुबार नावाबाबत असणाऱ्या अर्जाची व्यवस्था करण्यात आली होती.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी
-------------
माझ्या भावाचे नाव दुबार नाव असल्याने अर्ज मागितला, परंतु अर्ज उपलब्ध नसल्याचे झोनल अधिकाऱ्यांनी कळवले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मतदान केंद्रावर अपेक्षित तयारी नसल्याचे चित्र होते.
- सुधीर पाटील, नागरिक, नालासोपारा
----------------
आज मतमोजणी
वसई-विरार शहर महापालिकेच्या मुख्यालयात २९ प्रभागांतील जागांसाठी मतमोजणी प्रक्रिया शुक्रवारी (ता. १६) पार पडणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागातून कोण बाजी मारणार, कोणाला पराभवाचा सामना करावा लागेल, हे स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

