विद्यार्थी रमले निसर्गमेळ्यात

विद्यार्थी रमले निसर्गमेळ्यात

Published on

विद्यार्थी रमले निसर्गमेळ्यात
स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण
कल्याण, ता. २० (वार्ताहर) : पर्यावरण दक्षता मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली फिनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निसर्गमेळा २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध शाळेतील सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण १० वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण २३ शाळेतील ५२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धांमागचे मुख्य उद्दिष्ट पर्यावरण शिक्षण देणे व त्याचबरोबर जनजागृती घडवणे हा होता.
या निसर्गमेळ्यामध्ये झाडे ओळखा स्पर्धा, पीपीटी सादरीकरण, स्वाक्षरी संकलन, फुलपाखरू ओळखा, वक्तृत्व स्पर्धा, पक्षी नोंदवही, चित्रकला, मातीचे भांडे रंगवणे, रील इट लाईव्ह आणि पथनाट्य अशा एकूण १० स्पर्धांचा समावेश होता. सर्व स्पर्धांसाठी तज्ज्ञ व मान्यवर परिक्षकांचे सहकार्य लाभले. सर्व विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
पर्यावरण दक्षता मंडळातर्फे खारफुटी या विषयावर प्रदर्शन सादर करण्यात आले. तसेच, नवरात्री व मकरसंक्रांतीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या घटांचे अपसायकलिंग करण्याच्या कल्पनेला पाठिंबा देत, खत प्रकल्पातून मातीचे भांडे उपलब्ध करून देण्यात आले, असे रोटरी क्लबच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, पर्यावरण दक्षता मंडळाचे स्वयंसेवक व मनाली धांगडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मदत केली. तर, समीक्षा चव्हाण आणि रूपाली शाईवाले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com