एम. व्ही. पाठक यांच्या हाती पश्चिम सागरी क्षेत्राची धुरा
एम. व्ही. पाठक यांच्या हाती पश्चिम सागरी क्षेत्राची धुरा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी क्षेत्राच्या कमांडरपदाची सूत्रे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) एम. व्ही. पाठक यांनी सोमवारी (ता. १९) मुंबईत अधिकृतपणे स्वीकारली. यानिमित्त आयोजित भव्य संचलन समारंभात त्यांनी पदभार स्वीकारला.
जुलै १९८९ मध्ये भारतीय तटरक्षक दलात दाखल झालेल्या एडीजी पाठक यांना तटरक्षक दलातील सर्व प्रकारच्या जहाजांचे नेतृत्व करण्याचा मान लाभला आहे. त्यांच्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या किनारी व प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. यामध्ये मुंबईतील पश्चिम सागरी क्षेत्राचे चीफ ऑफ स्टाफ, केरळ व माहे विभागाचे कमांडर, नवी दिल्लीतील प्रशासन विभागाचे प्रधान संचालक, अंदमान-निकोबार (पोर्ट ब्लेअर) तसेच ईशान्य विभागाचे (कोलकाता) कमांडर अशी पदे समाविष्ट आहेत. तटरक्षक मुख्यालय, नवी दिल्ली येथे त्यांनी उपमहासंचालक (ऑपरेशन्स व किनारी सुरक्षा) म्हणूनही काम पाहिले आहे. पश्चिम सागरी क्षेत्राची सूत्रे हाती घेण्यापूर्वी एम. व्ही. पाठक हे नवी दिल्ली येथे उपमहासंचालक (सीजीएसबी) पदावर कार्यरत होते. त्यांच्या उल्लेखनीय व समर्पित सेवेबद्दल त्यांना ‘राष्ट्रपती तटरक्षक पदक’ आणि ‘तटरक्षक पदक’ या प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
ब्रीदवाक्याशी सदैव कटिबद्ध!
नव्या पदाची जबाबदारी स्वीकारताना एडीजी पाठक यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांशी समन्वय साधून किनारपट्टी सुरक्षा आणि सागरी सुरक्षितता अधिक बळकट करण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. भारतीय तटरक्षक दल आपल्या ‘वयम् रक्षामः’ म्हणजेच ‘आम्ही संरक्षण करतो’ या ब्रीदवाक्याशी सदैव कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

