स्वच्छता दूतांचा एल्गार , आरोग्याची ऐशी तैशी

स्वच्छता दूतांचा एल्गार , आरोग्याची ऐशी तैशी

Published on

वसईत कचरा संकलन ठप्प
स्वच्छता दूतांचे मागण्यांसाठी काम बंद आंदोलन
वसई, ता. २० (बातमीदार)ः वसई-विरार महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. त्यामुळे शहरातील सर्वच भागात स्वच्छता दूत आले नसल्याने कचरा व्यवस्थापन कोलमडल्याचे चित्र होते.
वसई-विरार शहरात रोज ७०० टन कचरा जमा होतो. स्वच्छता दूतांच्या माध्यमातून हा कचरा क्षेपणभूमीवर संकलित होतो. मात्र, बुधवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन पुकारले होते. या वेळी वसई-विरार शहर महापालिकेने नवीन ठेकेदाराची नियुक्ती केल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आमची ग्रॅच्युइटी, बोनस, वेतन यासह विविध मागण्या पूर्ण होणार नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले होते. या वेळी वसई-विरार शहरातील नवनिर्वाचित नगरसवेक सफाई कामगारांच्या आंदोलनस्थळी हजर झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तसेच नवीन ठेकेदार नियुक्त करण्याच्या निर्णयाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
--------------------------------
नगरसेवकांची धावपळ
वसई पश्चिम नवघर माणिकपूर येथे ४०० कर्मचारी साईनगर मैदानावर उपस्थित होते. या वेळी बविआचे नगरसेवक शेखर धुरी, प्रकाश रॉड्रिग्ज, कल्पेश मानकर, अजय रॉड्रिग्ज, नगरसेविका प्रमिला पाटील, पुष्पा जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांची भेट घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आवाहन केले.
------------
अनेक वर्षांपासून सफाई कामगार म्हणून काम करत आहे. अचानक ठेकेदार बदलल्यामुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच आमचा पगार, ग्रॅच्युइटी आणि अन्य मागण्या प्रलंबित आहेत. त्याचा विचार प्रशासनाने करावा.
- परशुराम म्हात्रे, स्वच्छता कर्मचारी
--------------
वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता आली आहे. महापौर बसण्यापूर्वीच स्वच्छता विभागाकडून ठेकेदार बदलण्यात आला. मात्र, आम्ही सफाई कर्मचाऱ्यांसोबत कायम असणार. त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणार.
- शेखर धुरी, नगरसेवक, वसई पश्चिम
------------
शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी स्वच्छता दूत घेत असतात. त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका असून, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महापालिकेने त्यांना सर्व अधिकार द्यावेत, ही मागणी केली.
- प्रमिला पाटीला, नगरसेवक वसई पूर्व
-----------
ठेकेदाराची नियुक्तीची प्रक्रिया आगोदरच सुरू होती. सफाई कर्मचाऱ्यांना जुन्या ठेकेदारांकडून ग्रॅच्युइटी, बोनस, रजेचा पगार मिळणार आहे. अडचण येणार नाही, तसेच नवीन ठेकेदारांकडून पुढील काम सुरू केले जाणार आहे.
- अर्चना दिवे, उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com