विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५,८०० जणांवर कारवाई
विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५,८०० जणांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर शनिवारी राबविण्यात आलेल्या १२ तासांच्या विशेष मोहिमेत पाच हजार ७८७ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेसाठी उपनगरी मार्गावरील २० प्रमुख स्थानकांवर तसेच लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि शटल गाड्यांमध्ये ७५० तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
विनातिकीट प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे रेल्वेच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने ही विशेष मोहीम राबवली. पकडलेल्या प्रवाशांपैकी ६२ टक्के प्रवासी एसी लोकल आणि प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये तिकीट न घेता प्रवास करीत होते. शनिवारी लोकल गाड्यांमध्ये तुलनेने गर्दी कमी असते; तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे चित्र समोर आल्याने रेल्वे प्रशासनालाही आश्चर्य वाटले. या १२ तासांच्या विशेष मोहिमेदरम्यान ५,७८७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली, तर नियमित तपासणीदरम्यान अजून २,००० प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला. या सर्व कारवाईतून २५ लाख २३ हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली. विशेष मोहिमेसाठी तिकीट तपासणी कर्मचारी गर्दीच्या स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर तैनात होते. त्यातच केवळ पाच प्रमुख उपनगरी स्थानकांवर १,२००हून अधिक विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले. कारवाईदरम्यान २० स्थानकांवर ३,५२७ प्रवाशांवर, तर गाड्यांमध्ये २,२१५ प्रकरणांची नोंद करण्यात आली. याशिवाय दिवा-रोहा आणि दिवा-वसई विभागात धावणाऱ्या ६० मेल-एक्स्प्रेस व शटल सेवांमध्येदेखील तिकीट तपासणी करण्यात आली.
...
सर्वाधिक कारवाई
रेल्वेच्या या विशेष मोहिमेत सीएसएमटी, दादर आणि पनवेल या स्थानकावर सर्वाधिक विनातिकीट प्रवासी पकडले गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

