राष्ट्रवादीकडून रोहा तालुक्यातील उमेदवार जाहीर
राष्ट्रवादीकडून रोहा तालुक्यातील उमेदवार जाहीर
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून अनेक दिग्गजांना ‘विश्रांती’
रोहा, ता. २१ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी रोह्यात झालेल्या विशेष बैठकीत ही घोषणा केली. रोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४ व पंचायत समितीच्या ८ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक दिग्गज व प्रभावी इच्छुक उमेदवार होते. मात्र, पक्षहित आणि संघटनात्मक समतोल राखण्यासाठी काही वरिष्ठ नेत्यांना व इच्छुकांना पक्षश्रेष्ठींनी ‘विश्रांती’चा सल्ला दिल्याचे समजते. विशेष म्हणजे, उमेदवारी न मिळाल्यानंतरही नाराज कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला मान देत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय राहण्याची ग्वाही दिली आहे. उमेदवारी घोषणेसाठी रोहा शहरातील कुलकर्णी यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची विशेष बैठक पार पडली. या वेळी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांतील पक्षाच्या यशाचा उल्लेख करत, हीच यशाची परंपरा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही कायम ठेवावी, असे आवाहन केले. पक्ष व मित्र पक्षांच्या सर्व जागा निवडून आणून संघटना अधिक बळकट करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या वेळी तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यातील संभाव्य युतीचे संकेत दिले.
...................
राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार
नागोठणे जि. प. गट (सर्वसाधारण)- किशोर जैन, नागोठणे पं. स. गण (नामप्र महिला)- समृद्धी संतोष काळे, आंबेवाडी जि. प. गट (नामप्र महिला)- निधी जाधव, आंबेवाडी पं. स. गण (सर्वसाधारण)- संजय मांडळुसकर, कोलाड पं. स. गण (नामप्र)- जगन्नाथ धनावडे, भुवनेश्वर जि. प. गट (सर्वसाधारण)- मधुकर पाटील, भुवनेश्वर पं. स. गण (सर्वसाधारण) - सुरेश मगर, धाटाव पं. स. गण (सर्वसाधारण महिला)- विजया विनोद पाशीलकर, घोसाळे जि. प. गट (सर्वसाधारण महिला)- रोहिणी रामचंद्र सकपाळ, घोसाळे पं. स. गण (सर्वसाधारण) -किसन मोरे, न्हावे पं. स. गण (सर्वसाधारण महिला) - शिवानी परेश म्हात्रे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

