मुलुंडमध्ये समाजमाध्यमांवर व्याख्यानमाला
मुलुंडमध्ये समाजमाध्यमांवर व्याख्यानमाला
मुलुंड, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्र सेवा संघाच्या आरोग्य विभागातर्फे समाजमाध्यम या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजमाध्यमांचा वापर आणि त्याचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय असणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ला सायंकाळी ६ वाजता, मुलुंड (पश्चिम) येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले सभागृहात होणार असून, प्रवेश विनामूल्य आहे. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सध्या समाजमाध्यमांचा सर्रास वापर वाढताना दिसत आहे. किशोरवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटक समाजमाध्यमांचा प्रमाणाबाहेर वापर करीत असल्याचे चित्र आहे. घरबसल्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संवाद साधता येणे, फोटो-व्हिडिओ शेअर करणे तसेच काही मिनिटांत महत्त्वाच्या बातम्या व सूचना मिळणे हे समाजमाध्यमांचे फायदे असले तरी त्याचे दुष्परिणामही लक्षात घेणे आवश्यक आहे.
कुटुंबातील आपापसातील संवाद कमी होणे, भावनिक अंतर वाढणे, विविध ऑनलाइन घोटाळ्यांत फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होणे, असे प्रकार वाढत आहेत. सोशल मीडियामुळे जगाशी संपर्क वाढला असला तरी नात्यांमधील दुरावा वाढला आहे का, सोशल मीडियाची दुधारी तलवार योग्य पद्धतीने कशी वापरावी, अशा प्रश्नांवर या व्याख्यानमालेत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
सोशल मीडिया म्हणजे नेमके काय? रील्स पाहणे करमणूक की व्यसन? सोशल मीडिया पाहणे महागात पडू शकते का? सुजाण नागरिक म्हणून सोशल मीडियाचा वापर कसा करावा? या आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर समाजशास्त्रज्ञ ज्ञानदा देशपांडे, मानसशास्त्रज्ञ डॉ. सुनीला डिंगणकर तसेच रेडिओलॉजिस्ट व समन्वयक डॉ. श्वेता देव जोग उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

