मलंगगड फ्युनिक्युलरला भाविकांचा प्रतिसाद
श्री मलंगगड फ्युनिक्युलर पर्यटकांच्या पसंतीस
यात्रेपूर्वीच ‘हाउसफुल्ल’ प्रतिसाद; एका दिवसात ११ हजार भाविकांचा प्रवास
डोंबिवली, ता. २७ : अंबरनाथ तालुक्यातील ऐतिहासिक श्री मलंगगडावर जाण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘फ्युनिक्युलर रोपवे’ सेवा भाविकांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे. २९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मुख्य यात्रेपूर्वीच या सुविधेने लोकप्रियतेचे शिखर गाठले असून, रविवारी एकाच दिवसात तब्बल ११ हजार भाविकांनी या सुविधेचा लाभ घेतला. सुरक्षित आणि गतिमान प्रवासामुळे ही सेवा सध्या ‘हाउसफुल्ल’ सुरू आहे.
गडावर जाण्यासाठी पूर्वी पायऱ्यांचा खडतर प्रवास करावा लागत असे; मात्र फ्युनिक्युलरमुळे हा प्रवास आता अवघ्या काही मिनिटांत आणि सुरक्षितपणे पार पडत आहे. प्रतिव्यक्ती १५० रुपये तिकीट दर असूनही, वेळेची होणारी बचत पाहता भाविकांनी याला पसंती दिली आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी ही सेवा वरदान ठरली आहे. सलग सुट्ट्यांमुळे सध्या गडावर भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. रविवारी झालेल्या विक्रमी गर्दीमुळे फ्युनिक्युलर प्रशासनाला मोठा आर्थिक लाभ झाला आहे. एका दिवसात सुमारे १६.५ लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याचा अंदाज असून, यात्रा काळात हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यात्रेसाठी प्रशासन सज्ज
२९ जानेवारीपासून मलंगगड यात्रेला रीतसर सुरुवात होत आहे. या काळात लाखो भाविक गडावर दर्शनासाठी येतात. फ्युनिक्युलर सेवेमुळे गडाच्या पायऱ्यांवरील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून, अपघातांचा धोकाही टळणार आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी श्री मलंगगडाच्या पायथ्यापर्यंत केडीएमटीच्या जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे भाविकांचा प्रवास अत्यंत सुलभ होत आहे. वृद्ध व मुलांसाठी ही सुविधा विशेष सोयीस्कर ठरत आहे.
पालिकेच्या महसुलातही भर
फ्युनिक्युलर सेवा सुरू झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याचा थेट फायदा केडीएमटी बससेवेलाही होत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता केडीएमटीने बस फेऱ्यांमध्ये वाढ केली असून, महापालिकेच्या वाहतूक विभागाच्या महसुलातही यामुळे भर पडत आहे.
विक्रमी प्रवास : एका दिवसात ११,००० भाविक.
महसूल : सुमारे १६.५ लाख रुपये (एक दिवसाचा अंदाज).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

