उद्यानातील ई-टॉयलेटला टाळे

उद्यानातील ई-टॉयलेटला टाळे

Published on

उद्यानातील ई-टॉयलेटला टाळे
तळोजा सेक्टर १४ मध्ये नागरिकांची गैरसोय

खारघर, ता. २८ (बातमीदार) : तळोजा सेक्टर १४ परिसरातील सार्वजनिक उद्यानात उभारण्यात आलेल्या ई-टॉयलेटला सध्या टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पालिका प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी आणि स्वच्छतेच्या दृष्टीने तळोजा सेक्टर १४ मधील उद्यानात ई-टॉयलेटची उभारणी केली. त्याचा फायदा येथील नागरिकांना होत होता. मात्र, सध्या ही सुविधा बंद अवस्थेत असल्याने उद्यानात येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उद्यानात खेळणी आणि ओपन जिम आहे. त्यामुळे उद्यान सकाळ-संध्याकाळी उद्यानात नागरिकांची मोठी गर्दी असते. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच व्यायामासाठी येणारे युवक यांचा उद्यानात नियमित वावर असतो. अशा ठिकाणी शौचालयाची सुविधा अत्यावश्यक असतानाही ई-टॉयलेट बंद असल्याने नागरिकांना पर्याय नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
तळोजा सेक्टर १४ परिसरातील ई टॉयलेट सुरू करण्यात आले होते. सध्या ते बंद असेल, तर माहिती घेऊन तत्काळ सुरू केले जाईल, असे पालिकेचे उपायुक्त वैभव विधाते यांनी सांगितले.


ई-टॉयलेट तत्काळ सुरू करण्याची मागणी

उद्यानात तासनतास बसणाऱ्‍या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी अडचण होत आहे. सुविधा असूनही ती वापरता येत नसेल, तर अशा कामाचा उपयोग काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पालिकेने ई-टॉयलेट तत्काळ सुरू करून त्याची नियमित देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

फोटो - 805

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com