राजकीय प्रतिक्रिया

राजकीय प्रतिक्रिया

Published on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा जनता दरबार असो वा मंत्रालय ते नेहमी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवताना दिसत असत. सर्वांचे लाडके नेता असलेले दादा आज आपल्यात नाहीत. महाराष्ट्राची ही खूप मोठी हानी आहे.
- संजय दिना पाटील, खासदार
----
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमुळे समाज, राजकारण आणि प्रशासनावर गहन दुःखाची छाया पसरली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या विकासाच्या मार्गदर्शक आणि जनहितार्थ काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक होते. देव त्यांच्या कुटुंबाला या दु:खाशी सामना करण्याची शक्ती देवो.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
-----
तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने बळ देणारे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत! मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत काम करताना त्यांची कार्यपद्धती आम्हाला जवळून अनुभवता आली. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
- नितेश राणे, मत्स्यव्‍यवसायमंत्री
-----
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने मला खूप माेठा धक्का बसला आहे. अजित पवारांची काम करण्याची एक स्वतःची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती, हे नाकारता येणार नाही. त्यांच्या पत्नी, कुटुंब, मित्र आणि पक्षाच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
-----
दिवंगत अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू, अनुभवी आणि ठाम विचारांचे नेतृत्व होते. मतभेद असले तरी विचारांचा आदर राखणे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणे ही त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात एक स्पष्ट वक्ता, आणि वैयक्तिक आयुष्यात एक सहृदय मित्र आपण गमावला आहे.
सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com