सीईटीपी चेंबरवर गोण्यांचा ढीग

सीईटीपी चेंबरवर गोण्यांचा ढीग

Published on

सीईटीपी चेंबरवर गोण्यांचा ढीग
बोईसर, ता.२९ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकलयुक्त सांडपाणी सीईटीपीकडे वाहून नेणाऱ्या चेंबरच्या परिसरात माती भरलेल्या गोण्यांचा ढीग साचला आहे. यामुळे व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या चेंबरमार्गे कारखानदारांकडून थेट रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित चेंबर माती भरलेल्या गोण्यांच्या साहाय्याने तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले होते. यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया करूनच सीईटीपीकडे पाठवणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चेंबरमधील मातीच्या गोण्या काढून टाकण्यात आल्या. मात्र, गोण्यांची विल्हेवाट लावली नसल्याने चेंबरच्या बाजूला ठेवले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, गोण्या फाटल्याने माती रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे वाहनचालक, दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com