विमा पॉलिसीच्या नावाखाली सव्वा कोटींचा गंडा

विमा पॉलिसीच्या नावाखाली सव्वा कोटींचा गंडा

Published on

पनवेल, ता. ३१ (वार्ताहर) : विमा पॉलिसीचा फायदा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका सायबर टोळीने पनवेलमधील ५८ वर्षीय व्यक्तीकडून तब्बल एक कोटी ३३ लाख उकळवून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र पाटील (वय ५८) हे व्यवसायाने लेखापाल (अकाउंटंट) असून, आजारपणामुळे ते मागील वर्षभरापासून घरीच आहेत. सायबर टोळीने डिसेंबरमध्ये त्यांना पियुष सोमाणी नावाने संपर्क साधून त्यांचे त्यांची विमा पॉलिसीची मुदत संपल्याचे सांगितले. तसेच शेवटचा हप्ता भरल्यास त्यांना मोठा परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले. पाटील यांनी विश्वास ठेवून सुरुवातीला काही रक्कम भरली. त्यानंतर सायबर टोळीने कधी पॉलिसी समाप्त, तर कधी २२ लाख मिळणार असल्याचे प्रलोभन दाखवून पाटील यांना जाळ्यात ओढले. पैसे भरल्यानंतर सायबर टोळीने रवी कपूर नावाची व्यक्ती असल्याचे भासवून त्यांना बनावट पावत्या पाठवल्या. बँकेच्या एका माजी कर्मचाऱ्यानेही सदर पावत्या खऱ्या असल्याचे सांगितल्याने पाटील यांचा विश्वास बसला. त्यानंतर सायबर टोळीने संगनमत करून पाटील यांना वेळोवेळी विविध बँक खात्यांत तब्बल एक कोटी ३३ लाख ५८ हजार रुपये भरण्यास भाग पाडले, मात्र सायबर टोळीने त्यांना पैसे दिले नाहीत. उलट त्यांना आणखी ३३ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. मोठी रक्कम भरल्यानंतर शंका आल्याने पाटील यांनी त्यांच्या मित्राकडे याबबात चौकशी केली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com