विकासकामांच्या धुळीमुळे नागरिकांना त्रास
नेरूळ, ता. २ (बातमीदार) : शहरात विविध ठिकाणी अनेक विकासकामे सुरू आहेत. पालिकेकडून होणाऱ्या विकासकामांसोबत शहरात नव्या इमारती, तसेच पुनर्विकास प्रकल्पदेखील सुरू आहेत. त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे मानखुर्द येथून सातत्याने प्रदूषण नवी मुंबईकडे येत असताना, आता या विकासकामांच्या धुळीने नवी मुंबईकर हैराण झाले आहेत.
सानपाडा सेक्टर ८ व सेक्टर ३ येथे सुरू असलेल्या विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ व प्रदूषण निर्माण होत आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी सानपाडा विभागातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. धुळीमुळे श्वसनास त्रास होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची ही बाब दुर्लक्षित करता येणारी नव्हती. कचरे यांनी तातडीने ही बाब पालिकेकडे कळवली. प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने धूळमुक्त करण्यासाठी स्प्रेअर वाहन आणून संपूर्ण परिसरात पाण्याची फवारणी केली. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला.
उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना त्रास कायम
चार ते पाच मजल्यांपेक्षा उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनाही धुळीचा त्रास जाणवत आहे. आगामी काळात पालिकेने उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी देखील उपाययोजना शोधण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

