डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पनवेल, ता. ५ (बातमीदार) : महापालिकेच्या कळंबोली विभागातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये सिडकोच्या के. एल. टाइप इमारतींच्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मलनिस्सारण वाहिन्यांच्या गळतीमुळे सांडपाणी साचून दलदलीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून, याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रभागातील डासप्रवण भागात आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी व धूर फवारणी करण्याची मागणी नगरसेवक रामदास शेवाळे यांनी केली आहे.
कळंबोलीतील प्रभाग क्रमांक ८ मध्ये सिडकोच्या वसाहतीमध्ये हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, या परिसरातील मलनिस्सारण वाहिन्या व ड्रेनेज चेंबर अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्यांना गळती लागलेली असून, ड्रेनेज चेंबरमधून सांडपाणी रस्त्यावर व मोकळ्या जागांमध्ये बाहेर येत आहे. के. एल. २ परिसरात सांडपाणी साचल्यामुळे दलदलीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढत आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर बसणे तर दूरच, घरात राहणेही नागरिकांना अवघड झाले आहे. डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या डासांपासून होणाऱ्या साथीच्या आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पालिकेकडून सदर परिसरात नियमित डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी तसेच धूर फवारणी होत नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रामदास शेवाळे यांनी कळंबोली प्रभाग अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

