स्वराज अभियानच्या मागणीला यश
स्वराज अभियानच्या मागणीला यश
घनकचरा घोटाळ्याप्रकरणी आयुक्तांचे पोलीस तक्रारीचे निर्देश
विरार, ता. २ (बातमीदार) : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात मोठ्या अनियमिततेचा संशय निर्माण झाला असून, भोयदापाढा व गोखीवरे येथील क्षेपणभूमीवरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट न लावता कंत्राटदारास कोट्यवधींचे बिल दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाच्या पाठपुराव्यानंतर आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणी घेऊन आयुक्तांनी संबंधित कंत्राट अखेर रद्द केल्याने घनकचरा विल्हेवाट घोटाळ्याला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, याप्रकरणी स्वराज अभियानचे नागरी तक्रार विभाग संयोजक रजनीकांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
वसई–विरार शहर महानगरपालिकेने घनकचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी मे. सार्ड युटीलिटी कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. यांना २० वर्षांचा ठेका दिला होता. मात्र, प्रत्यक्षात कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता खोटी कागदपत्रे सादर करून ३४ कोटी रुपयांचे बिल उचलल्याचा संशय व्यक्त झाला. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयुक्तांनी सुनावणी घेऊन ठेका रद्द केला असून, आर्थिक गैरव्यवहार, बनावट कागदपत्रे, सुरक्षा अनामत रक्कम जप्ती, दंड वसुली तसेच यापूर्वीच्या बायोमायनिंग कामकाजाची पोलिसांमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

