रायगडकरांनी नेत्रदानातून जपले सामाजिक भान
रायगडकरांनी नेत्रदानातून जपले सामाजिक भान
१४७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान; ४१ जणांना मिळाली नवी दृष्टी
अलिबाग, ता. २ (वार्ताहर) : आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून रायगड जिल्ह्यातील नागरिक सामाजिक बांधिलकी जपत आहेत. रायगडकरांनी केलेल्या मरणोत्तर नेत्रदानामुळे १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षांच्या कालावधीत तब्बल ४१ दृष्टिहीन व्यक्तींना पुन्हा सृष्टीचे दर्शन घडले आहे.
रायगड जिल्ह्यात नेत्रदानाबाबत जनजागृती वाढत असून, दरवर्षी सुमारे ३०० नागरिक मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करीत आहेत. या कालावधीत जिल्ह्यात १४७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. या नेत्रदानातून ४१ अंध व्यक्तींवर बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी देण्यात आली. उर्वरित दान केलेले नेत्रपटल संशोधनासाठी पाठविण्यात आले आहेत.
माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे नेत्र काही तास जिवंत राहतात. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत नेत्रपटल काढल्यास अंधत्व आलेल्या व्यक्तींना त्याचा लाभ होऊ शकतो. यशस्वी नेत्ररोपणानंतर संबंधित व्यक्तीला सुमारे ६० टक्क्यांपर्यंत दृष्टी मिळू शकते. नेत्रदानात डोळ्याच्या बुबुळाच्या पाठीमागील कॉर्निया (Connea) या भागाचे रोपण केले जाते. संकलित नेत्रांचे दोन ते तीन दिवसांच्या आत रोपण होणे आवश्यक असते.
चौकट :
नेत्रदानाचा लेखाजोखा (१ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५)
मरणोत्तर नेत्रदान : १४७ जण
एकूण नेत्र बुबुळ संकलन : २९४
जिल्हा रुग्णालय : ८८ नेत्र बुबुळे (४४ जण)
शंकर आय बँक : १६ नेत्र बुबुळे (८ जण)
लक्ष्मी आय बँक : १९० नेत्र बुबुळे (८० जण)
नेत्ररोपण शस्त्रक्रिया : ४१
संशोधनासाठी वापर : ११६
इतर संस्थांकडे पाठवलेले : ६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

