बेकायदा बांधकामावरून तंबी

बेकायदा बांधकामावरून तंबी

Published on

बेकायदा बांधकामावरून तंबी
प्रभाग अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र बंधनकारक
भाईंदर, ता. २ (बातमीदार) : शहरातील प्रभागात एकही अनधिकृत बांधकाम नसल्याचे साप्ताहिक प्रमाणपत्र प्रभाग अधिकारी ब बीट निरीक्षक यांना द्यावे लागणार आहे. मिरा-भाईंदर पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून, माहिती चुकीची आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. त्याची दखल घेत आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधकामे झाली नसल्याचा दावा केला होता. त्यावर आयुक्तांनी प्रत्येक प्रभाग अधिकारी व बीट निरीक्षक दर आठवड्याला प्रभागात एकही अनधिकृत बांधकाम झाले नाही, असे प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिल्यानंतर आयुक्तांकडून त्याची पडताळणी होणार आहे. तसेच माहिती चुकीची आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. याव्यतिरिक्त प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक यांचा एक व्हॉट्सॲप समूह तयार करावा लागणार आहे. तिथे बीट निरीक्षकांना बेकायदा बांधकांमांचा दैनंदिन अहवाल सादर करावा लागणार आहे.
----------------------------
फेरीवाल्यांवरही नजर
प्रभागांमध्ये अनधिकृत बांधकामे होऊ नये, याची सर्वस्वी जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांची, बीट निरीक्षकांची असते. बेकायदा बांधकाम आढळल्यास त्यावर तातडीने कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, तर बेकायदा फेरीवाल्यांसाठी हीच बाब लागू करण्यात आली आहे. प्रभागात एकही नवा फेरीवाला बसलेला नाही, असेही प्रभाग अधिकाऱ्याला प्रमाणपत्रात द्यावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com