तुकाराम मालुसरे यांचे निधन

तुकाराम मालुसरे यांचे निधन

Published on

तुकाराम मालुसरे यांचे निधन

घाटकोपर, ता. २ (बातमीदार) : ह.भ.प. तुकाराम गणपत मालुसरे यांचे वयाच्या ९०व्या वर्षी नुकतेच निधन झाले. ते साखर गावचे वरिष्ठ मार्गदर्शक होते. पोलादपूर तालुक्यातील गेल्या ७५ वर्षांच्या वारकरी संप्रदायाच्या वाटचालीचे ते साक्षीदार होते. त्यांना मालुसरे कुळाचा वारसा लाभला होता. तसेच ते श्रीक्षेत्र पंढरपूरच्या पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते श्रीगुरू गुरुवर्य वै. ह. भ. प. नारायण घाडगे यांचे निस्सीम शिष्य होते. वयाची ७० वर्षे श्री क्षेत्र पंढरपूरची नियमित कार्तिकी वारी, ३० ते ३५ वेळा आळंदीची आणि मुंबई ते पंढरपूर अशी पाच वेळा आषाढी एकादशीसाठी पायी वारी केली. तरुणपणापासून वारकरी साहित्य वाचनाच्या आवडीतून संत साहित्याच्या दुर्मिळ ग्रंथ ठेव्यासह असंख्य पुस्तकांचा संग्रह त्यांच्याजवळ आहे.

फोटो - 424

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com