सिरोशी येथे जनसुनावणी

सिरोशी येथे जनसुनावणी

Published on

सिरोशी येथे जनसुनावणी
माळ जिल्हा परिषद उमेदवार डॉ. कविता वरे-भालके यांची उपस्थिती
मुरबाड, ता. ३ (वार्ताहर) : माळ जिल्हा परिषदेच्या उमेदवार डॉ. कविता वरे-भालके यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सिरोशी येथे ‘मूलभूत हक्कांविषयी जनजागृती व कायदेविषयक मदत’ या विषयावर जनसुनावणी कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (ता. ३१) हा कार्यक्रम पार पडला.
हा कार्यक्रम ग्रामपंचायत सिरोशी, कायदेशीर मदत व सहाय्य केंद्र, मुंबई आणि एनएमआयएमएस किरीट पी. मेहता विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये कायदेविषयक जाणीव वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची माहिती मिळावी, कायदेशीर अडचणींवर योग्य मार्गदर्शन व मदत मिळावी, या उद्देशाने ही जनसुनावणी घेण्यात आली. या वेळी नागरिकांनी विविध समस्या, तक्रारी व प्रश्न मांडले. त्यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः महिलांचे हक्क, सरकारी योजनांचा लाभ, आरोग्य, रोजगार, जमीन व मालमत्ता हक्क यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
डॉ. कविता वरे-भालके म्हणाल्या, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. जनसुनावणीसारखे उपक्रम लोकशाही अधिक सक्षम करण्यास मदत करतात. यात महिलांचा व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सरपंच शोभा मुकणे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच, उपसरपंच, सदस्य, सीआरपी, आशासेविका, अंगणवाडी सेविका, कृषी सखी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com