मतदान गोपनीयतेच्या हक्काचे उल्लंघन करू नये
मतदान गोपनीयतेच्या हक्काचे उल्लंघन नको
प्रसारमाध्यम प्रतिनिधींना राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) : मतदान व मतमोजणी केंद्रावरील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दक्षता घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. कोणत्याही मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर प्रवेशिकेशिवाय प्रवेश करता येणार नाही. प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी थेट मतदान केंद्रावरील मतदान कक्षाजवळ जाऊन पाहणी करणे किंवा छायाचित्रे, छायाचित्रण करणे, प्रतिबंधित आहे. मतदार करतानाचे छायाचित्र किंवा छायाचित्रण पुरेशा निर्देशित अंतरावरूनच करणे बंधनकारक असेल, ते करतानाही मतदान गोपनीयतेच्या हक्काचे उल्लघंन होता कामा नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदान व मतमोजणी केंद्रावरील संबंधित अधिकारी, कर्मचारी प्रवेशिकेची पडताळणी करूनच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान, मतमोजणी केंद्रावर प्रवेश देण्यात येणार आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान, मतमोजणी केंद्रावर छायाचित्रासाठी किंवा छायाचित्रणासाठी कॅमेराचे स्टँड नेता येणार नाही. राज्य निवडणूक आयोग, संबंधित जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी नेमलेला अधिकृत छायाचित्रकार किंवा कॅमेरामन यांनाच मतदान केंद्रात व मतमोजणी केंद्रात कॅमेराचे स्टँड घेऊन जाता येईल. मतदान किंवा मतमोजणी केंद्रावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची एकाच वेळी होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार गटागटाने सर्वांना आत सोडण्याबाबतचे किंवा परिस्थितीनुरुप नियोजन करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मतदान केंद्राध्यक्ष यांना असणार आहेत. सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

