जेन-झी युवतींसोबत ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६’वर थेट संवाद

जेन-झी युवतींसोबत ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६’वर थेट संवाद

Published on

जेन-झी युवतींसोबत ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६’वर थेट संवाद
मालाड, ता. ३ (बातमीदार) : भाजप युवा मोर्चा, मुंबई यांच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६’ या विषयावर १८ ते २८ वयोगटातील जेन-झी (Gen-Z) युवतींसाठी विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता मलाड (पश्चिम) येथील एस.एन.डी.टी. कॉलेजमध्ये होणार आहे.
या महत्त्वपूर्ण संवाद कार्यक्रमाला भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, ते जेन-झी युवतींशी थेट संवाद साधणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ अंतर्गत तरुणांसाठी मांडण्यात आलेल्या विविध योजना, उपलब्ध संधी आणि भविष्यातील दिशा यावर ते मार्गदर्शन करणार आहेत.
या संवाद सत्रात शिक्षण व्यवस्था, स्टार्ट-अप्ससाठी उपलब्ध संधी, रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान विकास, मुंबईचा सर्वांगीण विकास, महाराष्ट्राची प्रगती तसेच तरुणींशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे. जेन-झी पिढीच्या अपेक्षा, प्रश्न आणि सूचनांना थेट व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
तसेच तरुणींना आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत, त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा यावरही या वेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जेन-झी युवती उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com