दुचाकी चालकांना २५० हेल्मेटचे वाटप

दुचाकी चालकांना २५० हेल्मेटचे वाटप

Published on

दुचाकीचालकांना २५० हेल्मेटचे वाटप
रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत वॉकहार्ट रुग्णालयाचा उपक्रम

विरार, ता. ३ (बातमीदार) : मिरा रोडच्या वॉकहार्ट रुग्णालयाने काशी मिरा ट्रॅफिक पोलिसांसह रस्ते सुरक्षा जनजागृती मोहीम उपक्रम राबवला. रुग्णालयाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात प्रमुख वाहतूक चौकांवर एकूण २५० दुचाकीचालकांना हेल्मेटचे वापट करण्यात आले आहे. या वेळी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षात्मक साधनांचा वापर तसेच रस्ते अपघातांचे दीर्घकालीन आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वॉकहार्ट रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी दुचाकीचालक व पादचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत आपत्कालीन व ट्रॉमा केअरमधील अनुभव सांगितले. मूलभूत सुरक्षितता उपायांकडे दुर्लक्ष केल्यास कशा प्रकारे गंभीर डोक्याच्या दुखापती होतात व अनेक वेळा टाळता येण्यासारख्या मृत्यूंची शक्यता निर्माण होते, यावर त्यांनी विशेष भर दिला.या उपक्रमाला काशी मिरा ट्रॅफिक पोलिसांचे सहकार्य लाभले. सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश शिवरकर व पोलिस निरीक्षक सागर इंगोले यांनी अभियानाला योग्य मार्गदर्शन करून ते यशस्वीपणे राबविण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या सहभागामुळे आरोग्य संस्था व कायदा अंमलबजावणी यंत्रणांची रस्ते सुरक्षेसाठी असलेली संयुक्त जबाबदारी अधिक ठळकपणे समोर आली.
या वेळी वॉकहार्ट रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील कुमार यांनी सांगितले, रस्ते सुरक्षा ही प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक परिधान केलेले हेल्मेट आणि प्रत्येक पाळलेला वाहतूक नियम एक अमूल्य जीवन वाचवू शकतो. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आम्ही काशीमीरा ट्रॅफिक पोलिसांचे, विशेषतः एसीपी सतीश शिवरकर आणि पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांचे मनापासून आभार मानतो. एकत्रित प्रयत्नांतूनच आपण रस्ते अपघात कमी करू शकतो आणि समाज अधिक सुरक्षित बनवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com