बेकायदा फलकांप्रकरणी गुन्हे नोंदवणार

बेकायदा फलकांप्रकरणी गुन्हे नोंदवणार

Published on

तुर्भे, ता. २ (बातमीदार) : खांदेश्वर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी मुंबईमध्ये सर्वत्र जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेची परवानगी न घेता या कार्यक्रमाच्या अनधिकृत फलकांवर कारवाई करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी दिली.

विकसकांच्या एक संघटनेच्या वतीने डिसेंबरमध्येदेखील अशाच प्रकारे नवी मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक शहरांमध्ये लावून शहराच्या विद्रूपीकरणात भर पडली होती. या फलकांवर महापालिकेच्या नियमानुसार कोणतीही जाहिरात परवानगी असलेले स्टिकर नव्हते. त्यामुळे हे अनधिकृत फलक लावून महापालिकेचा लाखोंचा महसूल बुडवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या वेळी प्रशासनाने कोणतीही कारवाई न करता जणू काही बिल्डर लॉबीला पायघड्या घातल्या होत्या. आता असाच एक कार्यक्रम पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये होत आहे. या कार्यक्रमाचेदेखील मोठ्या प्रमाणात बेकायदा जाहिरात फलक नवी मुंबईमध्ये लावण्यात आले आहेत.

नुकत्याच झालेल्या नवीन महापालिकेच्या निवडणुकीनंतर विजय उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात विनापरवानगी अभिनंदनाचे फलक लावले होते. महापालिकेच्या वतीने काही दिवसांतच अशा सर्व फलकांवर कारवाई करण्यात आली; मात्र त्याच वेळी विकसकांच्या या फलकावर कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लवकरच कारवाई होणार!
महापालिकेच्या नियमानुसार शहर विद्रूपीकरण करणारे सर्व फलक काढून संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया केली जाते. त्यानुसार लवकरच यासंबंधीची माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राहुल गेठे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com