संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा ‘प्रतिभा शोध अभियान’

संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा ‘प्रतिभा शोध अभियान’

Published on

संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा ‘प्रतिभा शोध अभियान’
निवड झालेल्यांना संशोधन, प्रवक्तेपद व सोशल मीडियात कामाची संधी
मुंबई, ता. ३ : पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाने इतिहासाची जाण, लोकशाही मूल्ये आणि संविधानवादी विचार असलेल्या व्यक्तींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्देशाने काँग्रेसतर्फे ‘प्रतिभा शोध अभियान’ (टॅलेंट हंट) सुरू करण्यात आले असून, या माध्यमातून निवड होणाऱ्या व्यक्तींना काँग्रेस संघटनेत विविध पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे.
हे अभियान देशभरात राबविण्यात येत असून, उत्तर प्रदेशातून आतापर्यंत ५५० तर जम्मू-काश्मीरमधून १०० जणांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातूनही जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी हरी शंकर गुप्ता यांनी केले आहे.
टिळक भवन येथील काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गुप्ता यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्हा व तालुका स्तरावर विविध विषयांचे तज्ज्ञ, अभ्यासक आणि सक्षम व्यक्तींना काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संशोधन, विश्लेषण, प्रवक्तेपद तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागात कार्य करण्याची संधी देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेश राजहंस उपस्थित होते.

कार्यक्रमाची रूपरेषा
* १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार
* अर्जांची प्राथमिक छाननी केली जाईल
* काँग्रेसचे नेते, पत्रकार, इतिहासतज्ज्ञ व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या समितीकडून मुलाखती
* अंतिम निवड झालेल्यांना काँग्रेस संघटनेत विविध पदांवर काम करण्याची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com