महापौर होण्याआधी हर्षला थवीळ-चौधरी यांनी घेतले कूंभेरेश्वर महादेवाचे दर्शन
नवनिर्वाचित महापौर हर्षला थवीळ-चौधरी महादेवाच्या चरणी लीन
पडघा, ता. ३ (बातमीदार) ः कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नियोजित महापौर हर्षला थवीळ-चौधरी या महापौरपदी विराजमान होणार आहेत. त्याआधी त्यांनी भिवंडी तालुक्यातील पडघा येथील कुंभेरेश्वर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
हर्षला थवीळ-चौधरी या काही काळ भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील शेरेकर पाडा येथे वास्तव्यास होत्या. शुक्रवारी (ता. ३०) त्या शेरेकरपाडा येथे आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी तेथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच नागरिकांशी संवाद साधून लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. आमदार शांताराम मोरे आणि कुंभेरेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ठाणे जिल्हा मर फेडरेशनचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक पंडीत पाटील, सरपंच सायली पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णुदादा चंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. संजय पाटील, सामाजिक कार्यकर्त्या गौरी पाटील उपस्थित होते.
(पडघा - येथील कुंभेरेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने हर्षला थवीळ-चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

