मुंबई
डहाणूतील निर्मित पागधरे, नियती देसाई चमकले
डहाणूतील निर्मित, नियती चमकले
पालघर ः डहाणू तालुक्यातील निर्मित पागधरे, नियती देसाईने २५ व्या राष्ट्रीय स्पीड स्केटिंग प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. लहान मुलांच्या वयोगटात २०० मीटर रिले प्रकारात त्यांनी ही कामगिरी करत पालघर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांच्या यशाबद्दल डहाणू तालुक्यासह जिल्ह्यातून दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत असून, पालकांचे अभिनंदन केले जात आहे.

