सुनील तटकरे यांची तोफ धडाडणार
सुनील तटकरे यांची तोफ धडाडणार
निजामपूर जि. प. मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तीन सभा
माणगाव, ता. ३ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोरदार प्रचार सुरू केला आहे. खासदार आणि पक्षाचे नेते सुनील तटकरे यांची तोफ धडाडणार आहे. विरोधकांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या बिनबुडाच्या, निराधार आणि खालच्या पातळीवरील आरोपांना सडेतोड उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर सत्य मांडणार असल्याची माहिती निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार ॲड. राजीव साबळे यांनी दिली.
गुरुवारी (ता. ५) या मतदारसंघात तीन भव्य जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता गांगवली, ४ वाजता निजामपूर, तर ५ वाजता विळे येथील मैदानावर खासदार सुनील तटकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभांमध्ये केवळ भाषणच नव्हे, तर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश करणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

