गावठी पिस्सटल सह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या युवकास अटक,सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

गावठी पिस्सटल सह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या युवकास अटक,सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Published on

चार पिस्तूल व काडतुसे बाळगणाऱ्या तरुणास भिवंडीत अटक
भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) ः ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत एका तरुणास चार पिस्तूलासह चार जिवंत काडतुसे विनापरवाना बाळगल्याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. सोहिल बेग शोराब बेग मिर्झा (२०, रा. मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहिल हा सोमवारी (ता. २) मानकोली नाक्याकडून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वेहळे - भाटाळे येथील जय बारकुला देव चौक येथे संशयितरित्या वावरताना आढळून आला. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ चार लाख १२ हजार ९४० रुपये किमतीचे चार गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार अमोल देसाई यांच्या फिर्यादीवरून सोहिलच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com